Union Budget 2024 Updates In Marathi : गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने अनेकदा संसदेमध्ये आपला अर्थसंकल्प मांडला आहे. परंतु, यावेळी पहिल्यांदाच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2024-25 साठी आणि एनडीए सरकारसाठी पहिला अर्थसंकल्प सादर केला. महागाईचा दर सुमारे चार टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे अर्थमंत्री काय घोषणा करतात आणि सामान्य जनतेला कसा दिलासा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
जगभरातील आर्थिक अस्थिरतेचा परिणाम या अर्थसंकल्पावर होणार असल्याचे सांगितले गेले होते, आणि तेही प्रत्यक्षात दिसून आले आहे. अर्थमंत्री सीतारमन यांनी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाज घटकांवर लक्ष केंद्रित केल्याचे आणि पुढेही करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रोजगार, कौशल्य विकास, लघु व मध्यम उद्योग आणि मध्यम वर्गासाठी नवीन योजना आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पातील नऊ महत्त्वाचे घटक
- शेती क्षेत्रातील उत्पादकता: डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे शेतकऱ्यांना शेती पिकांचे संरक्षण, माती तपासणी यांची माहिती दिली जाणार आहे. या क्षेत्रासाठी एक लाख 52 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- कौशल्य विकास: राज्य सरकार व उद्योग विश्वासोबत योजना राबवून पाच वर्षांत 20 लाख युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. उद्योग विश्वाच्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार केला जाईल.
- मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय: बिहारसाठी नवीन विद्यापीठाची घोषणा, अमृतसर-कोलकाता मार्गावर उद्योग कॉरिडोर, रस्ते बांधणीसाठी 26,000 कोटी आणि मेडिकल कॉलेज यांचा समावेश आहे.
- उत्पादन व सेवा: एमएसएमई साठी केंद्राकडून निधी पुरवठा आणि कर्जासाठी गॅरंटी दिली जाईल. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो.
- शहरी विकास: पुढच्या पाच वर्षांत जवळपास एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. यासाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल आणि प्रशिक्षणार्थींना आर्थिक मदत दिली जाईल.
- ऊर्जा संरक्षण: पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर केली आहे. एक कोटी घरांना दरमहा 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.
- पायाभूत संरचना: 11 लाख कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांमध्ये खाजगी क्षेत्र गुंतवणूक करणार असेल तर त्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
- संशोधन व विकास: स्पेस टेक्नॉलॉजीसाठी 1,000 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन केला जाईल.
- नव्या पिढीतील सुधारणा: एफडीआय नियम अधिक सोपे करण्यात येणार आहेत. यामुळे अधिकाधिक परकीय गुंतवणूक भारतात येईल.
कर रचना आणि इतर घोषणा
शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकास
Union Budget 2024 Updates In Marathi : सरकारने दीड लाख कोटी रुपये शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी दिले आहेत. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे शेतकऱ्यांना माहिती मिळेल. राज्य सरकार आणि उद्योग विश्वासोबत योजना राबवून पाच वर्षांत 20 लाख युवकांना प्रशिक्षण दिले जाईल.
बिहारसाठी घोषणा
बिहारसाठी नवीन विद्यापीठ, अमृतसर-कोलकाता मार्गावर उद्योग कॉरिडोर, रस्ते बांधणीसाठी 26,000 कोटी आणि मेडिकल कॉलेज या घोषणांची समावेश आहे.
एमएसएमई साठी निधी
एमएसएमई साठी केंद्राकडून निधी पुरवण्यात येणार आहे. संस्थांकडून कर्जासाठी गॅरंटी दिली जाईल.
इंटर्नशिप संधी
पुढच्या पाच वर्षांत जवळपास एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल आणि प्रशिक्षणार्थींना आर्थिक मदत दिली जाईल.
पायाभूत सुविधा
11 लाख कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांमध्ये खाजगी क्षेत्र गुंतवणूक करणार असेल तर त्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
स्पेस टेक्नॉलॉजी
1,000 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन केला जाईल. परकीय चलन मिळवण्यासाठी स्पेस टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन दिले जाईल.
एफडीआय नियम
एफडीआय नियम अधिक सोपे करण्यात येणार आहेत. यामुळे अधिकाधिक परकीय गुंतवणूक भारतात येईल.
कर रचना [Union Budget 2024 Updates In Marathi]
स्टॅंडर्ड डिडक्शन
स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 रुपयांवरून 75,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पेन्शनची मर्यादा 15,000 वरून 25,000 पर्यंत वाढवली आहे.
नवीन कर रचना
- शून्य ते तीन लाख: कोणताही टॅक्स नाही.
- तीन ते सात लाख: पाच टक्के टॅक्स.
- सात ते दहा लाख: 10% टॅक्स.
- दहा ते बारा लाख: 15% टॅक्स.
- बारा ते पंधरा लाख: 20% टॅक्स.
- पंधरा लाखांवरील: 30% टॅक्स.
कॅपिटल गेन टॅक्स
लॉंग टर्म कॅपिटल गेनवर 12.5% टॅक्स आणि 1.25 लाख रुपये प्रति वर्षाची कॅपिटल गेन एक्सेंप्शन मर्यादा निश्चित केली आहे.
Union Budget 2024 Updates In Marathi गरीब व मध्यमवर्गीयांसाठी योजना
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना
एक कोटी घरांना दरमहा 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.
परवडणारी घरं
सव्वा दोन लाख कोटी रुपये सरकारने परवडणारी घरांसाठी दिले आहेत.
महिला व तरुणांसाठी योजना
उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत
महिलांना देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
एमएसएमई साठी लोन
एमएसएमई साठी कोणत्याही गॅरंटी शिवाय लोन दिले जाणार आहे.
मुद्रा योजना
मुद्रा लोनची मर्यादा 10 लाखावरून 20 लाखांपर्यंत वाढवली आहे.
Union Budget 2024 Updates In Marathi
या सर्व योजनांमुळे आणि घोषणांमुळे आर्थिक विकासाच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी योजना आणि निधीची तरतूद करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं जाईल अशी अपेक्षा आहे.
1 thought on “Union Budget 2024 Updates In Marathi : गरीब, महिला, युवा आणि शेतकरी याना काय मिळाले ?”