Majhi Ladki Bahin Yojana offline application : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा महत्त्वपूर्ण अपडेट

Majhi Ladki Bahin Yojana offline application : मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिलांना आधार देण्यासाठी 1500 रुपये प्रतिमास मानधन देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana offline application

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now
Majhi Ladki Bahin Yojana offline application
Majhi Ladki Bahin Yojana offline application

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बदल

याच योजनेच्या संदर्भात आपण पाहिले की राज्य शासनाच्या माध्यमातून कागदपत्रांमध्ये ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्यामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे अर्ज करण्यासाठी उलंब होणार होता. त्यामुळे या योजनेचे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची समस्या

Majhi Ladki Bahin Yojana offline application : परंतु हे सर्व करत असताना सुद्धा अर्ज भरत असताना लाभार्थ्याला मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नाहीत. बऱ्याच साऱ्या महिला निरक्षर आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचा कांगावा करून नको असलेली कागदपत्र देखील मागितली जात आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. आणि अशाप्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महिलांना जे काही कॉम्प्युटर सेंटर असतील किंवा इतर ठिकाणी भेट द्यावी लागत आहे, त्याची मदत घेऊन अर्ज भरावे लागत आहेत. या समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बैठक आणि निर्णय

याच पार्श्वभूमीवर, 4 जुलै 2024 रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये या योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण आणि काटेकोर पणे अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत.

नवीन जीआर आणि अंगणवाडी सेविकांची भूमिका

मित्रांनो, 3 जुलै 2024 रोजी या योजनेचा नवीन जीआर निर्गमित करण्यात आला आहे. या जीआरच्या माध्यमातून ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्यामार्फत अर्ज भरवून घेण्यासाठी प्रति अर्ज 50 रुपयांचे मानधन देखील निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी आणि प्रत्येक महिला लाभार्थीला याच्या अंतर्गत पात्र करण्यासाठी अर्ज आता अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून भरवून घेतले जाणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अर्ज कसा भरायचा?

त्यामुळे कुठेही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येत नसेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी घाई गडबड करू नका. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेची अंतिम तारीख आहे. 8 जुलैपासून प्रत्येक जिल्हा स्तरावरती विशेष शिबिर आणि मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये फक्त आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्माचा पुरावा (टीसी किंवा जन्माचे प्रमाणपत्र), आणि दोन फोटोसह आपल्या अंगणवाडी सेविकेला भेटा. अंगणवाडी सेविकेकडे पीडीएफ स्वरूपातील अर्ज आहे, त्याबरोबर सहमतीपत्र देखील देण्यात आलेले आहे. फक्त आपली कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे जमा करायची आहेत. पीडीएफ स्वरूपातील हा अर्ज भरवून घेतला जाईल आणि सहमतीपत्रावर सही घेतली जाईल. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरवून घेतले जाणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण विशेष शिबिर आणि मोहिम

त्यामुळे इतर कुठेही अर्ज भरून चुका करून मानधनासाठी अपात्र होण्यापेक्षा घाई गडबड न करता, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे शक्य असेल तर भरा. नसेल तर आधार कार्डची झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स, जन्मदाखल्याचे प्रमाणपत्र किंवा टीसी आणि दोन फोटोसह अंगणवाडी सेविकेला भेटा. 8 जुलै 2024 अर्थात सोमवारपासून राज्यामध्ये विशेष मोहीम राबवली जात आहे आणि विशेष शिबिर आयोजित केले जात आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यात येणाऱ्या समस्यांमधून महिलांची सुटका होऊन, अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana offline application

मित्रांनो, (Majhi Ladki Bahin Yojana offline application)असा दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट होता. या माहितीचा आपल्याला नक्की उपयोग होईल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद!


3 thoughts on “Majhi Ladki Bahin Yojana offline application : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा महत्त्वपूर्ण अपडेट”

Leave a Comment