LIC Bima Sakhi Yojana 2025: ऑनलाइन अर्ज कसा भरायचा?

LIC Bima Sakhi Yojana 2025: ऑनलाइन अर्ज कसा भरायचा? : एलआयसी म्हणजेच Life Insurance Corporation ऑफ इंडिया तर्फे बीमा सखी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेत महिलांना महिन्याला स्टायपंड (Stipend) मिळणार आहे. जर परफॉर्मन्स चांगला असेल, तर बोनस (Bonus) सुद्धा दिला जाईल. चला, या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

LIC Bima Sakhi Yojana 2025: ऑनलाइन अर्ज कसा भरायचा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now
LIC Bima Sakhi Yojana 2025
LIC Bima Sakhi Yojana 2025

बीमा सखी योजना काय आहे?

बीमा सखी योजना महिलांसाठी खास डिझाइन करण्यात आली आहे.

बीमा सखी योजना – त्वरित माहिती टेबल

घटकतपशील
योजना नावबीमा सखी योजना (LIC)
योजनेचा उद्देशमहिलांना रोजगाराची संधी व आर्थिक स्वावलंबन
पात्रता18-70 वर्षे, किमान 10वी उत्तीर्ण
स्टायपंडपहिला वर्ष: ₹7000, दुसरा वर्ष: ₹6000, तिसरा वर्ष: ₹5000
बोनसपहिल्या वर्षी 24 पॉलिसी पूर्ण केल्यावर ₹48,000 बोनस
योजना कालावधीतीन वर्षे
महिन्याचे टार्गेटकिमान 2 पॉलिसी
वार्षिक टार्गेट24 पॉलिसी
कागदपत्रे आवश्यकआधार कार्ड, पत्ता पुरावा, 10वी प्रमाणपत्र, फोटो
ऑनलाइन अर्ज लिंकhttps://licindia.in
अर्ज प्रक्रिया शुल्कशून्य (फ्री)
कामाचे स्वरूपकॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पॉलिसी विक्री

ही माहिती योजनेबद्दल जलद समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे!

  • महिन्याला मिळणारा स्टायपंड:
    • पहिल्या वर्षी: ₹7000 प्रति महिना.
    • दुसऱ्या वर्षी: ₹6000 प्रति महिना (65% टार्गेट पूर्ण करणे आवश्यक).
    • तिसऱ्या वर्षी: ₹5000 प्रति महिना (तसेच 65% टार्गेट पूर्ण असणे आवश्यक).
  • बोनस: पहिल्या वर्षी 24 पॉलिसी पूर्ण केल्या, तर ₹48,000 चा बोनस मिळतो.
  • योजना कालावधी: तीन वर्षे.

पात्रता निकष (Eligibility Criteria)

  • वय: किमान 18 वर्षे आणि कमाल 70 वर्षे.
  • शिक्षण: किमान 10वी उत्तीर्ण.
  • रिलेटिव्ह्स ऑफ एलआयसी एजंट किंवा कर्मचारी अर्ज करू शकत नाहीत.
  • निवृत्त कर्मचारी आणि माजी एजंट यांना परत नियुक्ती साठी अर्ज करता येणार नाही.

काय काम करायचं आहे?

या योजनेत महिलांना “बीमा सखी एजंट” म्हणून काम करायचं आहे.

  • महिन्याला किमान 2 पॉलिसी विकणे आवश्यक आहे.
  • एका वर्षात 24 पॉलिसी पूर्ण करणे टार्गेट राहील.
  • तीन वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करायचं आहे.
  • हे सॅलरी बेसिस जॉब नसून, स्टायपंड स्वरूपात पैसे मिळणार आहेत.

कागदपत्रांची यादी (Documents Required)

  • Age Proof: आधार कार्ड (Self-Attested).
  • Address Proof: आधार कार्ड किंवा अन्य वैध ओळखपत्र.
  • Educational Qualification: 10वीचे प्रमाणपत्र.
  • पासपोर्ट साईज फोटो.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Online Application Process)

  1. वेबसाईटला भेट द्या:
    • LIC च्या अधिकृत वेबसाईटवर जा (https://licindia.in).
    • डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा.
  2. फॉर्म भरायला सुरूवात करा:
    • पूर्ण नाव टाका (आधार कार्डवरील नावासारखं).
    • जन्मतारीख भरावी (18-70 वर्षांच्या दरम्यान).
    • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्या.
    • संपूर्ण पत्ता (Address Line 1, Address Line 2, तालुका, पिनकोडसह) भरा.
    • एलआयसी एजंट किंवा कर्मचारी नाही हे “No” निवडा.
  3. सिटी आणि ब्रँच निवडा:
    • महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा.
    • तुमचं जवळचं शहर निवडा.
    • LIC च्या जवळच्या ब्रँचेसमधून किमान 1 आणि जास्तीत जास्त 3 ब्रँच निवडा.
  4. कॅप्चा भरा आणि सबमिट करा:
    • कॅप्चा बॉक्समधील कोड भरून “Submit” बटनावर क्लिक करा.

ALSO READ


अर्ज सबमिट केल्यानंतर काय होईल?

  • अर्ज सबमिट केल्यानंतर LIC कडून तुमच्याशी संपर्क केला जाईल.
  • काही दिवसांतच ट्रेनिंगबाबत माहिती दिली जाईल.
  • निवड झाल्यास, कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

महत्त्वाच्या सूचना (Important Instructions)

  • कोणत्याही प्रकारचा फ्रॉड कॉल किंवा पैसे मागणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.
  • एलआयसी कडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
  • सर्व प्रक्रिया पूर्णपणे फ्री आहे.

बीमा सखी योजना महिलांसाठी चांगली संधी आहे. योग्य प्रशिक्षण आणि मेहनतीने महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवता येईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी आहे आणि योजनेचे फायदे खूप आहेत. मित्र-मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा!

  • कोणत्याही प्रकारचा फ्रॉड कॉल किंवा पैसे मागणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.
  • एलआयसी कडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
  • सर्व प्रक्रिया पूर्णपणे फ्री आहे.

जय हिंद, जय महाराष्ट्र!

Leave a Comment