हमीपत्र व सेल्फ सर्टिफिकेट कसं भरायचं ?Majhi Ladki Bahin Hamipatra and Self Certificate

Majhi Ladki Bahin Hamipatra and Self Certificate : जय महाराष्ट्र मित्रांनो!आज आपण “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना“साठी अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत. या योजनेत अर्ज करताना आपल्याला कोणती कागदपत्रे लागतात आणि त्यासाठी काय तयारी करायची, हे आपण सविस्तर बघूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now
Majhi Ladki Bahin Hamipatra and Self Certificate
Majhi Ladki Bahin Hamipatra and Self Certificate

ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज पद्धती:

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना साठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला नारीशक्ती पोर्टल किंवा मोबाइल अॅपवरून फॉर्म भरता येतो. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या अंगणवाडीत जाऊन फॉर्म भरू शकता.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे तयार असावीत:

  1. आधार कार्ड: आधार कार्ड सर्वांच्या कडे आहे, त्यामुळे ते अपलोड करणे सोपे आहे. फोटोची साईज कमी करण्यासाठी तुम्ही फोटो रिड्यूसर अॅप वापरू शकता.
  2. अधिवास प्रमाणपत्र: हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते अपलोड करा.
  3. जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला: अनेकांच्या कडे हे कागदपत्रे असतात, त्यामुळं त्यात अडचण येत नाही.
  4. उत्पन्न प्रमाणपत्र: अनेकांना उत्पन्न प्रमाणपत्र नसते. त्यामुळे स्वयं घोषणापत्र भरून देता येते.
  5. अर्जदाराचे हमीपत्र: अनेकांना हे भरताना अडचण येते, परंतु हे सोपे आहे. आपण त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
  6. बँकेचे पासबुक: हे प्रत्येकाकडे असते, फक्त महिलांच्या नावाने असलेले अकाउंट असेल तरच ते द्यायचे आहे. पासबुक नसेल तर कॅन्सल चेक सुद्धा चालतो.

हमीपत्र कसे डाउनलोड करायचे


हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा , आणि डाउनलोड करून घ्या

स्वयं घोषणापत्र कसे भरायचे : Majhi Ladki Bahin Hamipatra and Self Certificate

स्वयं घोषणापत्र भरताना काही सोप्या स्टेप्स फॉलो करा:Majhi Ladki Bahin Hamipatra and Self Certificate

  1. अर्जदार महिलेचे नाव टाका.
  2. तुमचे लग्न झाले असेल तर “पत्नी” ऑप्शन निवडा आणि नवऱ्याचे नाव टाका. लग्न झाले नसेल तर “मुलगी” ऑप्शन निवडा आणि वडिलांचे नाव टाका.
  3. तुमचे वय टाका. उदाहरणार्थ, 22, 24, 26.
  4. व्यवसाय निवडा. उदाहरणार्थ, शेती, कृषी उद्योग, दूध व्यवसाय, खाजगी नोकरी.
  5. पत्ता टाका. उदाहरणार्थ, नाशिक, तालुका, जिल्हा.
  6. उत्पन्नाचे साधन टाका. उदाहरणार्थ, खाजगी नोकरी, शेती व्यवसाय, अन्य मजुरी.
  7. वार्षिक उत्पन्नाचे आकडे टाका. उदाहरणार्थ, 1,80,000 रुपये, 2,00,000 रुपये.
  8. उत्पन्नाचे साधन थोडक्यात वर्णन करा. उदाहरणार्थ, शिवण काम, मेडिकल दुकानात काम.

अर्जदाराचे हमीपत्र कसे भरायचे:

अर्जदाराचे हमीपत्र भरताना:

  1. उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी आहे यावर टिक मार्क करा.
  2. स्थळ, दिनांक आणि सही करा.

डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे:

डॉक्युमेंट अपलोड करताना:

  1. आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा स्वयं घोषणापत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँकेचे पासबुक किंवा कॅन्सल चेक, अर्जदाराचा फोटो अपलोड करा.
  2. फोटोची साईज कमी करण्यासाठी फोटो रिड्यूसर अॅप वापरा.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:

ऑनलाईन अर्ज करताना:Majhi Ladki Bahin Hamipatra and Self Certificate

  1. नारीशक्ती पोर्टल किंवा मोबाइल अॅपवर फॉर्म भरावा.
  2. सर्व माहिती नीट भरून, कागदपत्रे अपलोड करा.
  3. माहिती जतन करून फॉर्म सबमिट करा.

ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:

ऑफलाईन अर्ज करताना:

  1. जवळच्या अंगणवाडीत जाऊन फॉर्म घ्या.
  2. फॉर्म नीट भरून, आवश्यक कागदपत्रे जोडून द्या.

योजना संबंधित इतर माहिती:

  1. रेशन कार्ड: पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास ते उपयोगी आहे.
  2. महिलांसाठी लोन योजना: पिंक ई रिक्षा योजना यासारख्या विविध योजना आहेत.

Majhi Ladki Bahin Hamipatra and Self Certificate

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून अर्ज प्रक्रिया सोपी करता येईल. ऑनलाईन अर्ज करताना फोटोची साईज कमी करून अपलोड करणे, उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर स्वयं घोषणापत्र (Majhi Ladki Bahin Hamipatra and Self Certificate)देणे, आणि अर्जदाराचे हमीपत्र नीट भरून देणे आवश्यक आहे. ऑफलाईन अर्ज करताना जवळच्या अंगणवाडीत जाऊन फॉर्म भरावा.

आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरताना अडचण येत असल्यास किंवा काही शंका असल्यास, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या विविध चॅनल्सवरून मार्गदर्शन मिळवू शकता.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

Leave a Comment