National mission natural farming :जय शिवराय, मित्रांनो!
शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र शासनाने आणलेली एक महत्त्वाची नवी योजना तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आज आपण नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंग या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर, सुरू करूया!
25 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक स्वतंत्र योजना मंजूर करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत पुढील दोन वर्षांत तब्बल 2481 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Also Read :
- आधार सेंटर सुरू करण्यासाठी Aadhar Exam Registration 2024-25 | Operator Supervisor Exam Certificate
- Ladki Bahin Yojana New Update: पैसे वसूल होणार ? नवीन ऑप्शन आला, आलेले पैसे सुद्धा चेक करा | ladki bahin yojana
- Life Certificate Online Registration in Marathi csc : जीवन प्रमाणपत्र काढा ऑनलाइन 2024
योजनेचे उद्दिष्ट:
- शेतकऱ्यांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न उत्पादनासाठी प्रोत्साहित करणे.
- नैसर्गिक शेतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना 15,000 ते 20,000 रुपये प्रति हेक्टर प्रोत्साहन देणे.
- 15000 क्लस्टर तयार करून साडेसात लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीमध्ये रूपांतरित करणे.
शेतकऱ्यांसाठी खास उपक्रम:
- 10,000 जैवसाधन केंद्रे उभारण्यात येणार आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक साधने सहज उपलब्ध होतील.
- 2000 नैसर्गिक शेती प्रात्यक्षिक फार्म उभारून शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळच प्रशिक्षण दिले जाईल.
- 18.75 लाख शेतकरी नैसर्गिक शेतीची विशेष प्रशिक्षण घेतील.
- 30,000 कृषी सख्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.
- नैसर्गिक उत्पादनांना सोपी प्रमाणपत्र प्रणाली दिली जाईल, ज्यामुळे बाजारपेठेत विक्री सोपी होईल.
पायाभूत सुविधा आणि पशुधन विकास:
- शेतकऱ्यांचे पशुधन वाढवण्यासाठी प्रादेशिक चारा केंद्रे स्थापन केली जातील.
- नैसर्गिक शेतीसाठी संशोधन आणि कृषी विज्ञान केंद्रांशी सहकार्य करण्यात येईल.
योजनेच्या निधीचे वितरण:
- केंद्र सरकार: 1584 कोटी रुपये
- राज्य सरकार: 897 कोटी रुपये
महाराष्ट्रातील अंमलबजावणी:
महाराष्ट्रात या योजनेची मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित मार्गदर्शक सूचना आणि जीआर लवकरच निर्गमित केले जातील. इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा.
योजनेचे फायदे:
- नैसर्गिक शेतीतून उत्पादन खर्च कमी होईल.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
- आरोग्यदायी अन्नसुरक्षेची हमी मिळेल.
धन्यवाद, जय शिवराय!